कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
गीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

🎵बहरु दे लेखणी (गीत)

व्यासपीठ हक्काचे लाभले अपूर्व ही पर्वणी 
 साहित्याच्या अंगणी तुझी बहरू दे लेखणी... धृ

We are one चे ब्रीद आळवून शोधू प्रकाशवाट 
ज्योतीनेया ज्योत पेटवून हरवूया तिमिरास
शिक पचवण्या याबरोबर टिकेचीही झोडणी... १

कोण पेरतो शब्द तुझ्या रे मनाचिया गाभारी
ध्येय गाठण्या विश्वांगणी या घे ना गगन भरारी
रसिकमने ही चिंब न्हाऊ दे गंधीत शब्दसरींनी... २

दरवळू दे ना सुमन सुगंधी, साहित्य बाग उमलू दे
कधी विद्रोही रणांगणी समशेर बनूनी तळपू दे
भाव मनातील ओठी येऊ दे, नवरस दे उधळूनी... ३

प्रलोभने बहु मिळतील तुजला शरण नको जाऊस
सारस्वता गुंतूनी मायेत नमवू नको प्रतिभेस
नित्य आनंदासाठी अविरत चालू दे ही लेखणी... ४

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

🎵 शिकू आनंदे (शीर्षक गीत)

 शिकू आनंदे (शीर्षक गीत) 


शिकू आनंदे शिकू आनंदे पंख ज्ञानाचे लावून पाठी

मराठी शाळा खुलं आभाळ 

नभाच्या पार पेटवू ज्योती उज्वल भारतासाठी ||धृ||


ज्ञानाची उभारी घेऊन सारी

उधळू आनंद सरी 

अंतरी क्लेश, राहो न शेष 

विश्वास देऊया करी

 सुरांच्या लाटा... प्रकाशवाटा 

सजल्या तुझ्याच साठी

 नभाच्या पार पेटवू ज्योती उज्वल भारतासाठी ||१||


उमलावी आस, फुलावे श्वास,

ध्येयाचा ध्यास घेऊनी  

आनंदवारीत नाचुया गाऊया 

सुरांच्या सरी होऊनी

स्नेहाचा बंध..., भिनला गंध...

ओघळले जणू मोती

नभाच्या पार पेटवू ज्योती उज्वल भारतासाठी ||२||


गीतरचना

©®शिल्पा म. वाघमारे

सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खु ता गेवराई जि बीड

दि. 10.03.2022




 शिकू आनंदे


शिकू आनंदे शिकू आनंदे 

पंख ज्ञानाचे लावून पाठी

मराठी शाळा खुलं आभाळ 

उज्वल भारतासाठी ||धृ||


ज्ञानाची उभारी घेऊन सारी

उधळू आनंद सरी 

अंतरी क्लेश, राहो न शेष 

विश्वास देऊया करी

 सुरांच्या लाटा... प्रकाशवाटा 

सजल्या तुझ्याच साठी

मराठी शाळा खुलं आभाळ 

उज्वल  भारतासाठी

  ||१||


उमलावी आस, फुलावे श्वास,

ध्येयाचा ध्यास घेऊनी  

आनंदवारीत नाचुया गाऊया 

सुरांच्या सरी होऊनी

स्नेहाचा बंध..., भिनला गंध...

ओघळले जणू मोती

मराठी शाळा खुलं आभाळ 

उज्वल भारतासाठी||२||


मोकळ्या मनाने आनंद भराने

वेचूनी ज्ञानाची फुले 

नवी पहाट उमलण्यासाठी

सूर्य होतील गोजिरी मुले

आभाळा वरती संस्कारांचे

शिल्प देखणे कोरण्यासाठी 

मराठी शाळा खुलं आभाळ 

उज्वल भारतासाठी... ||३||


गीतरचना

©®शिल्पा म. वाघमारे

सहशिक्षिका 

लोकमाता अहिल्यादेवी होळकर जि प प्रा मराठी कन्या शाळा बार्शीटाकळी जि अकोला 

दि. 10.03.2022

🎵ज्ञानजागर.. ATM

 *सोहळा... ATMचा*

(चाल: धनी मलाही दाखवाना...) *सोहळा... ATMचा*



ज्ञानजागर मांडला, विठाबाई तुझे दारी

ज्ञानसागर सांडला, चंद्रभागेच्या तीरी

अशी नटली थटली, जशी आषाढाची वारी

डोळे भरून पाहुया ही आनंदवारी.. 

 

*कोरस*...ही आनंदवारी आहे लय लय लय भारी... ||धृ||


हम टिचर है हटके...

रंगवू  दुनिया सारी

आमचे अफलातून फंडे

वाट प्रगतीची न्यारी

आम्ही विश्वास पेरता

तरु भिडला आभाळी  

डोळे भरुन पाहुया ही आनंदवारी

...||१||


शिक्षणाच्या वारीचे

आम्ही वारकरी पहिले

हाव नाही आम्हा ठावं

श्वास जन्माचे वाहिले

स्वार्थ-अहम् कधीचा

चिरडला पायाखाली 

डोळे भरुन पाहुया ही आनंदवारी

......||२||


'We are one' ललकारी

दाही दिशांत दुमदुमली

दादा ताईंच्या रुपानं

तोरणं सोहळ्याची सजली

दिस गालात हासला, होता प्रेमभऱ्या भेटी

डोळे भरुन पाहुया ही आनंदवारी....||३||


गीत रचना: 

© शिल्पा म. वाघमारे

स. शि. जि. प. प्रा. शाळा मालेगाव खुर्द ता. गेवराई जि. बीड

19.03.2020

गुरुवार, १७ मार्च, २०२२

🎵भक्तीरंग

 भक्तीरंग 


रुप तुझे लोचनांत, नाम ओठी साजे

माळून ये स्वरांत रंगा, गीत होई माझे...धृ 


तुझ्या नामसुमांना रे, अखंड ओविते ओविते

चरणांवर वाहूनिया, नित्य रिती होते

हृदयाच्या गाभारी मुर्त तुझी राजे

माळून ये स्वरांत रंगा, गीत होई माझे... १


नादरंग, शब्दरंग, रंग रंग उधळे

भक्तीरंग देई ऐसा,काम-क्रोध झडे

जड झाले ओझे नाथा, ऐक ऐक माझे.. 

माळून ये स्वरांत रंगा, गीत होई माझे... २


रचना 

शिल्पा म वाघमारे 

सहशिक्षिका गेवराई जि बीड 

दि. 17.03.2021

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

🎵लेकी चालल्या साऊच्या

 लेकी चालल्या साऊच्या

वाट नवी शोधावया

नको अंधाराचं जीणं

सूर्य कवेत घ्यावया ... ||धृ||


आम्ही लेकी गं साऊच्या 

 वाटा नव्या शोधतोया


तुझ्या कुशीत गे माये

लाभे मायेची पाखर

तुझी देखता वणवण

जीव होई खालीवर

काळ दावी जरी डोळे 

त्याचे लगाम खेचाया... ||१||


आजी, आई नि ताईचं

जीणं पाहिलं बाईचं

98630735

7 ओढाताण 

का गं सारंच घाईचं..

घुसमट ही जन्मांची 

कोंदण हे तोडावया...||२||


साऊ माऊली आपुली

रुप जणू शारदेचं

तिनं फुलवून कळ्या 

दिलं दान सुगंधाचं

ओसाडल्या माळावर 

अक्षरबाग फुलवाया....||३||


रचना

शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खु ता गेवराई जि बीड

12/12/2021

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

@ 🎵 बालकविता वाट पाहता दमली शाळा

 

*चाल...* शाळा चांदोबा गुरुजींची...

         बालगीत
*वाट पाहता दमली शाळा...*

कसे अनोखे चित्र बदलले
विचारांत या जग विरले
वाट पाहता थकली शाळा
आणिक दमली सारी मुले... ||धृ||

अभ्यासासह गाणी गोष्टी
नाच नाचता शाळा डुले
दंगा मस्ती खेळत बागडत
बागेत जणू फुलली फुले...
कुठे हरवली अवचित सारी
कुणास ती पुसणार बरे.... ||१||

काही मोठी लहान काही
एकसंगती झुलणारी
गोड गोजिरी, कुणी लाजरी
पाखरे जशी भिरभिरणारी...
वाचून पुस्तक गिरवून पाटी
दिवस रोजचा सहज सरे... ||२||

मने चिमुकली कोमल कळी
कोमेजून झाली रडवेली
कशी काढावी समजूत बाई
आईला न कळे काही
गुरुंजीनाही सुटे न कोडे
शिकवावे कसे गणित आणि धडे...
||३||

गीतरचना
*©शिल्पा म. वाघमारे*
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड

सोमवार, १८ जानेवारी, २०२१

🎵विरहाचा विरह भावगीत...

 


अक्षरसंख्या :१८

११ व्या अक्षरावर यती


काअअ3व्यप्रकार :भावगीत


शीर्षक : विरह विरहाचा 



सांग पुन्हा कधी भेटणार  तू, मज प्रिया नव्याने

कस्तुरी गंधात भिजेल निशा, पुनव चांदण्याने... ||धृ||


भयाण तुफान चेतले आत, दारी श्रावणधारा 

स्वप्नांत, भासांत,तूच सामोरी, श्वासांत तो उबारा 

श्वास फुंकूनी, फुलव शिल्प हे, स्पर्श दे अधराने... ||१||


शब्दही अबोल, भिजले सूर, गाताना प्रेमगीत

 रात वैरीण छळते सारखी, बोचरा हा एकांत 

 मलूल जाणीव हुळहुळते, भिजते ओठी गाणे... ||२||


आसावले अनुरागी सूरही, श्रावण अधिरला

तुझ्या माझ्या मिलनास रे पुन्हा, क्षणही आतुरला

विरहाचा या विरह होऊ दे, मधूर मिलनाने... ||३||


रचना 

शिल्पा म वाघमारे 

स शि मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड 

दि. १७.०१.२१