कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
वऱ्हाडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वऱ्हाडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १८ मे, २०२१

वऱ्हाडी झोरा

 *झोरा*


माह्य  नाव टाकलं शाळेत अन्

खुटीचा झोरा काळ्ला बाबानं

टाक म्हणत यात पाटी लेखन

अन् जाजो म्हणे अरामानं...


तसाच म्या घेतला झोरा

अन् भाकर बांदली फडक्यात

पयला दिवस शाळेचा होता

निंगाली मी बी तोऱ्यात...


लयच हौस मले शिक्याची

शाळा पाऊनच मन भरलं

हजेरीत नाव आल्यावर तं

आबायच ठेंगणं झालं...


पयल्याच दिवशी मास्तरच्या

सर्व्या प्रश्श्नाईची देली उत्तर 

शाबासकी भेटली मले

साऱ्याइचे डोये फाटले टरटर...


पन सुट्टीत बंदेच लेकरं

 माह्या झोऱ्याले पाऊन हासत

अन् शिदोरीच्या फडक्याले

इस्टीलचा डब्बा दाखोत...


गरगरंच पानी आलतं

त्यावक्ती माह्या डोयात

पन माय म्हणे फक्त शिक

देव सापडीन अक्षरांत...


तापासून डोयाले शिक्षनाशिवाय

दुसरं काईच दिसलं नाई

अजूनई यादीनं डबडब भिजते

 त्या झोऱ्यातली पाटी अन् वई...


रचना

©शिल्पा म वाघमारे

स शि बीड

दि.२४.०४.२०२०

शनिवार, २३ मे, २०२०

असा भारी चालला उनाया*

*असा भारी चालला उनाया*

बांधेल असते वारं
अन् लोडशेडींगची भर
घरात भाईर करु करु
 जीवाची झाली मरमर...

कितीक प्याव पानी
ते बी थंड लागत नाई
दिवस सारा निंगून जाते
पन पान झाडाचं हालत नाही...

पाच मिनिटं चैन नाई
लेकरं बी करतात भिन्
सैपाकानं चुलीपाशी
जीवाले आनला शीन...

भाईर निंग्याची झाली बंदी
सूर्य आग आग वकते
कैदी झाला जीव घरात
डोसकं भलकसं संतापते...

झाळ तं एकीरंच रायलं
अधाश्यावानी आमी जंगलं तोळ्ले
लाव्याचं तं येत बी नाई मनात
दोष देत बसतो... ऊन पावसाले

 रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि 23.05.2020

मंगळवार, ५ मे, २०२०

सौंदर्य व फॅशनवऱ्हाडी रचना

सौंदर्य व फॅशन
वऱ्हाडी रचना

फॅशन टरेंड.. म्हणता म्हणता 
पुस्तक सुटून मोबाईल आले
जबाबदारी घातली खड्ड्यात
सेल्फीच्या फॅडनं जीवं चालले.. १


उलीउली लेकरं टीवीनं बिगळले
डिज्जेच्या नादात संगीत ईसरलं
तंबाखू घोटू घोटू सोताच्याच
भविष्याचं त्याईनं मातेरं केलं..२

गालात खर्रा दिवसभर सरत नाई
शाननं ओततात तोंडात पुडी
कामाले हलके, ऐतखाऊ दादा
वझं वाऊन इकळे मेले बुडा-बुडी

खरं सौंदर्य झाकतात पोरी
किरीम अन् पावडरीखाली
कदी समजीन सौंदर्याची व्याख्या
 फॅशनच्या या चमचम नावाखाली ४

सिगरेटच्या धुपटासंग कणकण
चांगलं जीवन चाललं उडून
प्रेमाचा तं गयाचं घोटला हो
वासनेच्या डबक्यात बुडून..५

पोरी तशाच वाया गेल्या
माय बापाचा पतिरा केला
लाज झाकनाऱ्या कपळेईचा
बिकिनी अन् मिनीस्कर्ट झाला..६

ज्या थोर पुरुषाईनं जीवाचं
रान केलं या समाजासाठी
त्याईच्या जयंत्या साजऱ्या होतात
नावापुरत्या डिज्जेत फॅशनसाठी.७

कदीकदी वाटते कुठी आलो 
आपुन रस्ता तं नाई हुकलो
कोण्या जन्माचं पाप होतं
अन् या युगात जलमलो..८

रचना ✍️
© शिल्पा म.वाघमारे
स.शि
जि बीड

स्पर्धेसाठी कविता 

 जबाबदारी 
वऱ्हाडी रचना



पुस्तकं सुटले न् मोबाईल आले
जबाबदारी घातली खड्ड्यात
सेल्फीच्या फॅडनं जीवं चालले.. १


उलीउली लेकरं टीवीनं बिगळले
डिज्जेच्या नादात संगीत ईसरलं
तंबाखू घोटू घोटू सोताच्याच
भविष्याचं त्याईनं मातेरं केलं..२

गालात खर्रा दिवसभर सरत नाई
शाननं ओततात तोंडात पुडी
कामाले हलके, ऐतखाऊ दादा
वझं वाऊन इकळे मेले बुडा-बुडी


सिगरेटच्या धुपटासंग कणकण
चांगलं जीवन चाललं उडून
प्रेमाचा तं गयाचं घोटला हो
वासनेच्या डबक्यात बुडून..४

पोरी तशाच वाया गेल्या
माय बापाचा पतिरा केला
लाज झाकनाऱ्या कपळेईचा
बिकिनी अन् मिनीस्कर्ट झाला..५

ज्या थोर पुरुषाईनं जीवाचं
रान केलं या समाजासाठी
जबाबदारी कायच्या संग खितात? 
जयंत्या तं डिज्जेत नाच्यासाठी..६


रचना 
© शिल्पा म वाघमारे 
तेल्हारा ता तेल्हारा 
जि अकोला

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

ओवी अंगणाची

ओवी... आंगणाची*

आंगणाची व्हती शोभा
बाई सडा रांगोई... नं
माय उठे झाकटीत
गाईचं आने शे... न..


शेंदे इरीचं ते पानी
घडगी-घडगी.. नं
दगळाच्या इरीले त्या
'काप'सुताच्या  दोरा... नं


आज डांबरी रस्त्यानं
शोभा आंगणाची गे.. ली
दारापुळची तुयसाबाई
बंगल्यावर चढ... ली


सांध्याकायच्या पायरी
येती सया न् गडणी
हासत नाचत 
खेळ रंगे गं आंग..णी


झाडंझुडं फुलफळं
 सावलीबी दाटवा...ट
उन्हायात गारव्याचा
बाई काय सांगू था... ट


भरल्या त्या आंगणाची
नाई होणार बाई स.. र
आठोणीत झुरे मन
कसं बदललं तंत.. र (तंत्र) 

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि 28..03.2019

झाकट...

झाकट....


झाकटीतच उठूनं
सडा सारोण करुनं
माई माय रंदावनात
दिवसभर पळते रुतून...

बापाची शिदोरी अन्
माह्या शाळेची घाई
नरम भाकरीसाठी
टुमणं लावे आजी माई...

निरेपिरे केल्याशिवाय तिच्या
पोटात टुकळा पडत नाई
किती मरमर करीन तरी
कोणाले कदर येत नाई...


जनवारई तिच्याच मांग
दुपारचं वावरात जाते
रगत आटोते साऱ्याईसाटी
तरी जो तो तिलेच बोलते...

आळेपिळे देत देतच
अभ्यास माया घेते
तिचं सारं दुखनं फक्त
माह्या जीवाले समजते...


उपकार नाई भुलनार
शिकून लय म्होटा हुईन
आमच्यासाटी भोगते दुख
तिले मी बी सुकात ठुईन....

रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि 25.12.2018