कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

🎵बहरु दे लेखणी (गीत)

व्यासपीठ हक्काचे लाभले अपूर्व ही पर्वणी 
 साहित्याच्या अंगणी तुझी बहरू दे लेखणी... धृ

We are one चे ब्रीद आळवून शोधू प्रकाशवाट 
ज्योतीनेया ज्योत पेटवून हरवूया तिमिरास
शिक पचवण्या याबरोबर टिकेचीही झोडणी... १

कोण पेरतो शब्द तुझ्या रे मनाचिया गाभारी
ध्येय गाठण्या विश्वांगणी या घे ना गगन भरारी
रसिकमने ही चिंब न्हाऊ दे गंधीत शब्दसरींनी... २

दरवळू दे ना सुमन सुगंधी, साहित्य बाग उमलू दे
कधी विद्रोही रणांगणी समशेर बनूनी तळपू दे
भाव मनातील ओठी येऊ दे, नवरस दे उधळूनी... ३

प्रलोभने बहु मिळतील तुजला शरण नको जाऊस
सारस्वता गुंतूनी मायेत नमवू नको प्रतिभेस
नित्य आनंदासाठी अविरत चालू दे ही लेखणी... ४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: