कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
सांस्कृतिक मंडळासाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सांस्कृतिक मंडळासाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

डाव अधुरा

*डाव अधुरा*


हरवलेल्या क्षणांची राजसा
निसटली हलकेच ओंजळ
आठवांत सुखद भिजताना
प्रश्न पुन्हा विचारे काजळ... १

काय सांगू तयास आता
जे मलाही न उमजले
प्रश्नांचा खच पडलेला
उत्तर तरी न मज दिसले...२

मनाच्या त्या कोपऱ्यात
दडून आहे अजूनही आशा
निराशेच्या तूफानांनी जरी
भंग पावल्या साऱ्या दिशा...३

का? कसे? अजुनही
मी कारणांस शोधते आहे
उत्तर सांगेल का हो कोणी
का प्रेम करणं गुन्हा आहे..?४

निरपेक्षतेतही मला का
लाभल्या अनंत यातना
श्वास फक्त वाहतो आहे
उरली नच संवेदना....५

"दोष तुझा" मी म्हणत नाही
नशीबाचा प्याला कसा सांडला
न कळे कुण्या जन्माचा नियतीने
डाव तो अधुरा पुन्हा मांडला...६

रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि १३.०४.२०

रविवार, २९ डिसेंबर, २०१९

@ आनंददायी रचनात्मक शिक्षण

आनंददायी शाळा... 


रचनात्मक शिक्षणाला सुरुवात झाली 
मिनू आता आमुची शहाणी झाली... 

लवकरच उठून लगबग करते
आईच्या आधीच रांगोळी काढते... 

दात घासून आंघोळ आटोपून पटपट
शाळेची तयारी करते ती झटपट... 

चिंचोके नि मण्यासंगे शिकली गणती
गणिताची तिला आता वाटत नाही भिती...

वाचन कोपरे तर सदाच खुले
वाचनाने ज्ञानाचे भांडार झाले...

रंगीत संगीत झाली हो शाळा
आईसम बाई आता लावतात लळा...

झाले आता सहज चित्र,खेळ, कथा
उंच उडून गेल्या, समस्या नि व्यथा... 

आनंद हिच जीवनाची मिळकत आहे खरी
मीनूला तर आता करमत नाही घरी

✍🏻✍🏻शिल्पा म.वाघमारे सहशिक्षिका बीड