कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
चारोळी संग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चारोळी संग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २१ मे, २०२०

वंशाचा दिवा

वंशाचा दिवा


कशासाठी हवा हो वंशाचा दिवा
पणती का प्रकाश देत नाही...
अज्ञानातून अंधश्रद्धा वधारते
तुमच्या या  अट्टाहासापायी...

पुर्वग्रह प्रसवत मनाच्या गर्भातून
उग्ररुप घेत पेटत गेला वणवा
कुणी टाकली ठिणगी सहजे
ज्ञानी जनहो वेगी तो विझवा...

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शिक्षिका बीड
२१.०५.२०२०

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

निसर्ग एक पुस्तक

निसर्ग*

एक विशाल पुस्तक हा निसर्ग

धरणीवरचा जणू प्रति स्वर्ग  ||१||



प्राची अंगणात रश्मी उधळण

रवी रेखितो रांगोळ्यांची शिंपण २



 किलबिल पक्ष्यांची श्राव्य मधुर

अद्भुतच कला तरु पर्णांवर...३



अचूकता साधे ओहटी-भरती

ऋतुराज्ञी आणि बहर पुष्पांची..४



पंकातील दल नित्य सांगे स्थैर्य

पूर नि वादळे शिकविती धैर्य..५



वात्सल्य कुशीत आपण रे भाऊ     

तिच्यासम देताना माणूस होऊ.६



रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि.2.9.2018