कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

@ 🎵 बालकविता वाट पाहता दमली शाळा

 

*चाल...* शाळा चांदोबा गुरुजींची...

         बालगीत
*वाट पाहता दमली शाळा...*

कसे अनोखे चित्र बदलले
विचारांत या जग विरले
वाट पाहता थकली शाळा
आणिक दमली सारी मुले... ||धृ||

अभ्यासासह गाणी गोष्टी
नाच नाचता शाळा डुले
दंगा मस्ती खेळत बागडत
बागेत जणू फुलली फुले...
कुठे हरवली अवचित सारी
कुणास ती पुसणार बरे.... ||१||

काही मोठी लहान काही
एकसंगती झुलणारी
गोड गोजिरी, कुणी लाजरी
पाखरे जशी भिरभिरणारी...
वाचून पुस्तक गिरवून पाटी
दिवस रोजचा सहज सरे... ||२||

मने चिमुकली कोमल कळी
कोमेजून झाली रडवेली
कशी काढावी समजूत बाई
आईला न कळे काही
गुरुंजीनाही सुटे न कोडे
शिकवावे कसे गणित आणि धडे...
||३||

गीतरचना
*©शिल्पा म. वाघमारे*
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: