कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
इतर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इतर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

घोषवाक्ये

 घोषवाक्ये



आहे जरी बंद शाळा

काळजी नको करु बाळा


घर आणि परिसर सारा

शाळाच ना दुसरी... विचार करा


नाही पुस्तक पाटी लेखणी

अनुभवांची इथे शिकवणी


कामे करुन छोटी छोटी

कौशल्ये मिळवू मोठी मोठी



चांगल्या सवयी नि कृतींतून शिकूया

सर्वांना चकित करुनच सोडूया

घोषवाक्ये


झाडे लावा झाडे वाचवा... 

पशुपक्ष्यांचे जीवन वाचवा....

🏝️🏝️🏝️


नियम पाळा रस्त्यावरचे...

जीवन अपुले होईल सुखाचे...

🛤️🛣️🛤️🛣️


वेळच्या वेळी नखे कापू

 दोनवेळा दात घासू... 

🦷🦷🤚🏻🤚🏻


उठून सकाळी वेळेत

नियमित जाऊ शाळेत... 

🏫🏫🌄🌄


पालन करता नियमांचे 

धडे घेऊनी शिस्तीचे... 

👨🏻‍🏫👩‍🏫


रचना

शिल्पा म वाघमारे

स शि बीड

शिल्पा म वाघमारे 

स शि बीड

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

छत्री

 आत्मकथा 

मी छत्री


माझी ऐटच न्यारी

मी कल्लरफूल नारी

ताईची गुलाबी, दादाची निळी, आईबाबांना कोणतीही चालते... पण आजोबांची काळी ती काळीच.


  माझ्या शिवाय पावसाळ्यात बाहेरच निघायचं नाही पूर्वी कुणी.. पण आता काय...! कधी बरसंल काही नेमच नाही...

ताईच्या बॅगेत तर सदाचाच माझा वास

माझ्याविना तर तिचा एकही दिवस नाही जात. 

उन्हाळ्यात मी तुमच्या त्वचेला जपते..

अश्शी मी भारी... कोपऱ्यात उभी राहते.


लेखन

शिल्पा म वाघमारे सहशिक्षिका बीड

रविवार, १४ मार्च, २०२१

३ मोगरा

 मोगरा 



गंध पसरला आज साऱ्या रानी
आनंदानं डुले मन हे सजनी....१

पानोपानी दडे हसतोय गाली
सुंदराच भासे हिरव्या महाली...२

शुभ्र चांदण्यांची लखलख तेज
तनसह मनही मढवी साज....३

माळताना पुन्हा स्पर्श ते स्मरले
रोमारोमी मी त्यासम मोहरले... ४

टवटव तयाची उभारी मना
अनुरागी भारलेला तू सजना..५

लाजेतच चूर हाय मी नाहले
प्रणयाच्या नशेत का हे जाहले..६

रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
10.12.2018