कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

सविता लेख

 सविता...


एक नाव.. जरा हटकेच दिसणारी व असणारीही ...


सामान्यांत असामान्य दिसणारी

व असणारीही ...


एक विलक्षण व्यक्तीमत्व

एक हळूवार जपलेलं सत्त्व.


एक सहज भेट... मैत्रीच्या कक्षा रुंदावत नेणारी...

निरागस, निर्मळ, बडबडी.. हो खूपच.. पण त्यातील सत्य, निरागसता, आर्तता आणि विशेष म्हणजे अकृत्रिमता...

निगर्वी, सहजतेतलं सौंदर्य अनुभव करवून देणारी...एक उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका, हरहुन्नरी लेखिका,संवेदना मांडणारी उत्कृष्ट कवयित्री, उत्तम वृत्तलेखिका आपल्या सर्वांची लाडकी व माझी प्रिय सखी... 

*सविता उत्तमराव ढाकणे*

बस... नाम ही काफी है... 



शब्दमाधुर्याने मनं जिंकण्याची जादु आहे जिच्याकडे... 

मग नियतीने शैक्षणिक उपक्रमांसह अनेक तालुका ते राज्यस्तरीय साहित्यिक प्रवास घडवून आणले. 


*मग काय... सविताशिवाय शिल्पा म्हणजे निव्वळ अपूर्णता...*

संख्येत  अंकानंतरच शुन्याचं काय ते महत्त्व! 

नाहीतर त्याचं अस्तित्व तरी काय! 


अगदी तसंच माझंही! 


मी त्या सवित्प्रकाशात स्वतःला प्रकाशमान करत होते अन् सदैव राहील. 


एक जीवाला जीव देणारी मैत्रीण... खूप गोड नातं... भाग्यवंताला प्राप्त होतं हे... नाहीतर या कलियुगात कुणी आहे का कुणाचं? 


माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या यशाला मोठ्ठं करुन सांगणारी... 

सर्व समाजमाध्यमांतून मला प्रसिद्ध करणारी... 

आभाळाएवढं मन असणारी... 

काय आणि किती सांगावं... 

मी खरंच अपूर्ण आहे जिच्याविना... 


*माझ्या प्रत्येक शब्द - सुराची साक्षी...*



*तिच्या सहवासातील काळाने जीवनाला सोनियाची झळाळी दिली. हे ऋणानुबंध देहांच्या दुराव्याने संपणारे नसतात... ते फक्त भासतात.*



*अंतराने का अंतरे अंतरावी!*


ही मैत्री निश्चितच प्रांजळपणे जपली जाईल... हा विश्वास आहे. 


*तुझा सहवास की अमृताचा स्पर्श झाला*

*मैत्रगंधाने भारले अशी मी जीवनाला अर्थ आला*




सखी तुला निरोगी आयुष्यासाठी व यशस्वी शैक्षणिक व साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा. 




ही दोस्ती तुटायची नाय....💛🤝