कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
उखाणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उखाणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ५ डिसेंबर, २०२२

उखाणा

 आजचा उपक्रम 

उखाणा



लग्नात चिमणा नवरा रुसला

चिऊताईने मग पदर खोसला

ताडताड त्याच्यासमोर गेली

मोठाले डोळे फाडून बघू लागली

म्हणाली उठ... चल... कसला रे हुंडा

आधीच होतं ना आपलं ठरलं

तरीही हे काय नवीनच आपलं...

मला नाही गरज तुझी.. आहे मी खमकी....

लग्न मोडायची नको देऊ धमकी

तुला जर जायचे.. खुशाल निघा...

कोणी नाही मिळणार.. विचार करुन बघा

माझ्या पतीराजांनी हुंडा नाही घेतला

भाग्यवान मी, सुखी संसार थाटला

श्रीकांतरावांच्या नावाचं आता कुंकू लावते

विठू तुझ्या कृपेनं सुखचांदण्यांत मी नाहते



रचना 

शिल्पा म वाघमारे 

सहशिक्षिका अकोला 

19.09.2022