. भाषिक कोडे
मी हो लहान लहान
तरी म्हणती सारे महान
मी जरी नाही तलवार
करी अज्ञानास ठार
मी साहित्यिकांची सखी
ज्ञानदीप मजठायी लखलखी
प्रज्ञावंत चालवी प्रतिभेच्या जोरावर
नाव सांगा माझे, त्याला मिळेल साखर
रचना
© शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
. भाषिक कोडे
मी हो लहान लहान
तरी म्हणती सारे महान
मी जरी नाही तलवार
करी अज्ञानास ठार
मी साहित्यिकांची सखी
ज्ञानदीप मजठायी लखलखी
प्रज्ञावंत चालवी प्रतिभेच्या जोरावर
नाव सांगा माझे, त्याला मिळेल साखर
रचना
© शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
मी कोण...
मी प्रतिकरुपी काया
दावी सकलांस दिशा
मी असता, नसे चिंता
भक्कम मानसीची आशा...१
दिशादर्शक, सूची, प्रमाण
नित्य सज्ज हे माझे रुपडे
नदी, सागर, डोंगर, दऱ्या
प्रतलावरही सहज सापडे...२
इतिहास वा भूगोल वाचा
आज, उद्या वाट्टेल तेव्हा
मैतर मी तुमचा हो आता
हाक द्या..... हवे तेव्हा...३
वाट्टेल तेथे भेटेन तुम्हा
क्षणांत शोधा मग वाट नवी
सारुनी अडसर सारे आता
साधा प्रगती जी तुम्हा हवी...४
प्राकृतिक नि राजकीय
आता तर ई- स्मार्ट झालो
फक्त एक क्लिक पुरे बस्स!
पहा ना मी स्टार्ट झालो...५
रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि. २६.२.२०२१