जगणं... सजा वाटते
मरण मरण म्हणून मरण येत नाही पांडुरंगा...
नाईतं कोणाले अठी जगा वाटते
कर्तव्याचा माथी गाडा
कधी कधी सजा वाटते...धृ
सुंदर आहे जीवन
मीच सांगतो लेकराईले
आत्महत्या पाप हाये
सांगत रायतो पाखराईले...
जा उत्तराईले प्रश्न पडतात ना
ता मलेबी घ्याव रजा वाटते...
कर्तव्याचा माथी गाडा
कधी कधी सजा वाटते...१
शिक्षण ज्ञान जीवन तारते
पण नशीबाचे लगामच भारी
चांगलं चांगलं देत जगलो
खोट्या देवाची केली नाही वारी
पन माया डोयात पानी पाऊन तुले देवा मजा वाटते
...कर्तव्याचा माथी गाडा
कधी कधी सजा वाटते...२
तुयाच नावाचा जप करत
एकेक श्वास चरणी वायला
खऱ्याच्या पदरी दुखाचं दान देऊन
तू तं ईटीहून उलसाक नाई सरकून रायला
हिशोब त्वालाच चुकन रायला
मलेतं कायमचं आता निजा वाटते...कर्तव्याचा माथी गाडा
कधी कधी सजा वाटते...३
एका तुया नामात म्हणतात
यज्ञाचं भेटते पुण्य
रातंदिवस नाम घेऊनबी मंग आमच्या पदरात फक्त दैन्य
तुया तं नजरेचा खेळ आहे जग
तरी कठीण तुले काय राजा वाटते...कर्तव्याचा माथी गाडा
कधी कधी सजा वाटते...
४
शिल्पा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा