सर्वप्रथम मनगाभाऱ्यापासून आभार...
एवढी सांभाळून ठेवावी का एखाद्या साधारण व्यक्तीची रचना? ... इतके असामान्य आहात आपण....
मला माझी ओळख करुन दिलीत आपण...
एक ना अनेक कितीतरी सुवर्णसंधी आपल्यामुळे पदरात पडल्या...त्या संधीचं सोनं करण्यात मी कितपत यशस्वी झाले ते माहित नाही. मात्र जे काही केले ते अगदी मनापासून... फक्त आणि फक्त माझ्या प्रत्येक लेकरापर्यंत पोहचण्यासाठी....
बदलीचा आदेश मिळाला... त्यानंतर शाळेने व गावकऱ्यांनी दिलेला स्नेहमयी निरोप...म्हणजे... या लेकीची पाठवणी होती...
सर्व सहकारी बंधू...जणू निवृत्ती, ज्ञाना, सोपान.... या मुक्ताला मुक्त करताना... मुक्त आसवांत वाहत होते .... त्यांना कसं सावरु... ते कळंत नव्हतं....
उद्याच्या वाटचालीसाठी ते आशीर्वत होते... मनाच्या कोपऱ्याला सदैव ओलावत ठेवतील या साडेसोळा वर्षातील आठवणी... समृद्ध करत जातील माझा कर्तव्यपथ...
आपण दिलेली प्रथम संधी... की खुली करुन दिलेली अनोळखी जगातील वाट... जिथे कुणीही माझं नव्हतं... तिथे सर्वांनी माझ्यावर इतकं प्रेम करावं... की गेल्या 22 तारखेपासून मी कुणी दैवी अवतार असल्याचा भास होतोय... "तुम्ही आमचे देव होते...." हे एका गावकऱ्याचे शब्द क्षणांत माझ्या समोर असंख्य प्रश्नांचा खच पाडून गेले.
रात्री 10...11...वाजेपर्यंत भेटायला म्हणून आलेले व तिथेच गुंतून बसल्यागत मुद्दाम थांबलेल्या बायका..
येताना रस्ता अडवून.. नका ना जाऊ... म्हणणारे व लहान मुलांसारखे ओक्साबोक्शी रडणारी मोठी माणसं... बायका... विद्यार्थी...
पाय जड झाले म्हणून निरोप द्यायला न येऊ शकलेले... यांबद्दल तर काय सांगू......
मी कोण होते...?
दोन तीन जिल्ह्यांपार एकटीच आलेली...
शिक्षक म्हणून कुठलाही अनुभव नसलेली...
कधीही ग्रामीण भागात न राहिलेली... नंतर तिथेच आपसूक रमलेली...
स्वप्नातही विचार केला नव्हता...माझ्यासारख्या सामान्य शिक्षकांसाठी अद्भुत होतं हे सारं काही... ...
कदाचित् त्यांचं माझ्यावर काही ऋणं बाकी असेल... त्याशिवाय हे सर्व सहज होत नाही.
म्हणून मी ही सेवा देऊ शकले...
योगायोग हा माणसांसाठी असतो...
मात्र माझ्या भगवंताचा तो well settled plan असतो.. असं मला वाटतं.
नाही का....
मी आपणा सर्वांपुढे खूप लहान आहे.
मला समृद्ध होण्यासाठी आपले मार्गदर्शन, आशीर्वाद, सुचना सदैव लाभू देत.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
माझ्याकडून अनावधानाने काही चुका झाल्या असतील, आपण दुखावले असाल... तर मोठ्या दादाने मोठ्या मनाने माफ करावे.
🙏🏻🙏🏻🙏🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा