रामात रंगलेला
हा जीव गुंतलेला
----
नामात रे तुझ्या हा
आत्माच दंगलेला
------
मी देहभान सारे
गाळून राहलेला
-----
पायी तुझ्या हरी हे
साराच वाहलेला...
वाटेवरी चक्षूंचा
हा श्वास टांगलेला
-----
पाहू नको कसोटी
हा दास थांबलेला
------
'मी' जाळला कधीचा
देहास बांधलेला
-----
बंधात गुंतले मी
का तूच थांबलेला
-------
तू सोडवी नियंत्या
हा जीव कोंडलेला
ये स्वागतास मी रे
आतूर जाहलेला
शिल्पा ✒
गागालगा लगागा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा