कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

म फुले २ कविता


ज्योतीबा


संगिनी जणू रणरागिणी

घेऊनी लढवले अवघे समर 

ज्ञानाची ज्योती देऊन करी या

युगयुगे झालेत अमर...|| ४||


 जागवू चला मन, मती पुन्हा 

मनमानी चालली जिथे जिथे 

 अधर्म, अंधश्रद्धधेस जाळण्या

ज्योतीच होऊया तिथे तिथे....||५||


महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्यातच 

ज्ञानसरीता जणू समृद्ध खुली

एक ना अनेक अनिष्ट प्रथांना

वाट तयांनी दाखविली... ||६||



रचना

@©शिल्पा म. वाघमारे

स शि अकोला 

दि २८.११.२०२२




क्रांती'ज्योती' 


नावातच ज्यांच्या असे दिव्य 'ज्योती'

'तमा' ची तया 'तमा' काय होती? 

समशेर करी त्या सत्य, धर्म, नीती

नि संगे 'शारदारुप' 'सावित्री' होती... १ 


घणाघाती वार तयाने, अथक साहला 

देखता लाजे अचल, अडीग राहिला

जाळून जाती मानवतेचा झेंडा रोवला

स्वधर्म कर्म निरपेक्ष, नैष्कर्म्य जाहला...२ 


झुंजला तमारी अविरत, परास्त करी अंधारा

जातीपातीपल्याड जागवी स्वधर्माचारा

कोळून प्याला विषाक्त विकारी प्रहारा,  

स्वयंसिद्ध होत ललना, भेदती कारा...३ 


वेधूनी भविष्या, केली लेक सबला

तेजस्वी तप्त लेखणी, जणू की ज्वाला

अज्ञान कापे थरथर, श्वास सृष्टीने घेतला

होता वार अविद्येवर, ज्ञानगंध फुलला...४


ज्ञानप्रभा उमलली, आभाळ मोकळे

लेकींच्या मुक्तीचे, वारा गाई पोवाडे

विजयी श्वास घेत कळ्या हासल्या गाली

ओलांडून उंबरठा ती चांदणं ल्याली...५


काव्यरचना

©शिल्पा म. वाघमारे

सहशिक्षिका बीड


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: