कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

मला न ठावे

 चूक कोणती.. मला न कळले

मला न ठावे... कुठे बिघडले

किती सोसले... फक्त सोसले

 सरी हरवल्या...नभ कोसळले


नयनी सागर... जरी दाटले

मन गाभारी काय साठले

शुष्क वाहती स्वैरी वारे

अनोळखी का सारे वाटले...


मीच माधवा कशी हरवले

सावर नाथा बघ अडखळले 

पुरता गोंधळ... कसला गुंता

कट कांगावे कुणी थाटले





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: