कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

प्रेम... मुक्तछंद

 प्रेम


प्रेम एक सहजभावना..नैसर्गिक अशी ओढ 

प्रेम कुणीही करावं, कशावरही करावं, 

अतातायी, उतावीळता सांडून, प्रेम फक्त जाणीवांनी टिपावं

कधी डोळ्यांत पहावं, अन् हृदयात साठवावं

तर कधी आठवांच्या अभ्रांनी मनाकाशी गच्च भरुन यावं

कधी कोसळावं त्या क्षणांनी, पुन्हा परतीची ज्यांची वाट नाही,

विरह सागर शांत पसरला, भरतीची का तेथे लाट नाही! 

भुकेल्यांना भाकरीवर, विद्यार्थ्यांने लक्ष्यावर करावं




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: