कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

आदरणीय साहेब

 *आदरणीय साहेब*


या गेवराई राष्ट्राचे राष्ट्रपिता आहात तुम्ही 

'काळम' असेल नाव तरी आमचे कलाम आहात तुम्ही ।।


कसं जमतं साहेब तुम्हाला

आमच्यात आमचं होऊन राहणं

शुभ्र पोशाख घालूनही 

या काळ्या मातीत चालणं

चहूदिशी मिळवली ख्याती तरी

ते सोज्ज्वळपणे बोलणं

छोट्या छोट्या गोष्टी जपून

सामान्यांस असामान्य बनवणं

'आधाराचा आधार' अन् ...

भ्रष्ट्राचाराचा संहार आहात तुम्ही 

बुडत्याचे तारणहार आणि  नकारात्मक विचारांवर प्रहार आहात तुम्ही || १ ||


'साहेब' म्हटल्यावर आपण.. 

कसं ऐटीत चालायला हवं 

दोन शब्दांचंच तेवढं

औपचारिक बोलायला हवं

पण खरं सांगायचं तर,

तुम्हाला कधी जमलच नाही,

दिखाऊपणाच्या झगमगाटात

आपण कधी रमलाचं नाही....

वाचकाची गीता आहात नि भरकटलेल्यांसाठी तेजोमय सविता आहात तुम्ही 

फक्त मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शकच नाहीत तर ज्ञानाची प्रवाही सरिता आहात तुम्ही ||२||


आपल्याकडे पाहूनच कळते

'आदर्शा'ची संज्ञा

विचार-कृतींची एकसंधता पाहून जागृत होते प्रज्ञा

रचनावादाचे प्रणेते आणि शांतीचे खजिनदार आहात तुम्ही

गायकाचे गीत आहात वादकाचे मधुर संगीत आहात तुम्ही 

शिक्षणाचे खरेखुरे हित आहात नि आमच्यासाठी जगण्याची रीत आहात तुम्ही... ||३||


हिच प्रार्थना त्या विधात्याला शतायुष्य 'महागुरू'स आमच्या लाभो... 

'वटवृक्ष' हा 'बोधिवृक्ष' होवो

 त्यास दृष्ट कुणाची न लागो 

आत्मविश्वास जागवणारी ज्योत 

आणि प्रेरणा ओतप्रोत आहात तुम्ही 

स्वतःतच सिद्ध समृद्ध ज्ञानपीठ आहात तुम्ही 

||४||


रचना : शिल्पा म.वाघमारे

सहशिक्षिका, बीड 

15.08.2016


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: