प्रीत गझल
वृत्त :मनोरमा
गालगागा गालगागा
प्रीत
मंद वारा शीत होता
गात माझे गीत होता
वाट वाटे एकटीची
सोबती तो मीत होता
पाखरांच्या चाहुलीने
वेडुला का भीत होता
सागराची लाट येता
ओंजळीने पीत होता
उष्ण लाटा साहलेल्या
त्या बिजाची जीत होता
विठ्ठलाने दान द्यावे
त्या प्रतीची प्रीत होता
******************
रदीफ : होता
कवाफी : शीत, गीत, मीत, भीत,पीत, जीत, प्रीत
अलामत : ई
रचना
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा