सांग ना साजना का असे वागणे
श्रावणी रात्रीने पापणीत जागणे
मी अशी एकटी भार ना पेलवी
फक्त ते एकदा मागते चांदणे
साहवे ना अता आठवे रात ती
त्या तिथे ते पुन्हा एकदा भेटणे
शब्द साधे तुझे पाकळी पाकळी
मंद वाऱ्यासवे आपुले वाहणे
तू छळावे मला मोहरावी तनू
रोखुनी तू नजर काळजा भेदणे
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
रदीफ : नाही - - -
कवाफी : वागणे, जागणे, चांदणे, भेटणे, वाहणे, भेदणे
अलामत : अ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा