कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, १२ जुलै, २०२२

माधवा... गझल



मेनका:गालगागा गालगागा गालगा


माधवा


मीच माझी माधवा ना राहिले

श्वास सारे याच पायी वाहिले


गुंतलेले मी सदा नामी तुझ्या 

का न तू माझ्याकडे रे पाहिले 


तप्त होते मार्ग सारे येथले

जन्म ते मी कैक होते साहिले... 


रुप ते शामा मलाही दाखवी

अर्जुनाला तूच होते दाविले


मोक्ष, मुक्ती सिद्धतेची राम का

आठवांच्या राम गंधी वाहिले 



रचना

शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका बीड


रदीफ - नाही 


कवाफी - राहिले, वाहिले, पाहिले, साहिले, दाविले, वाहिले


स्थिर अक्षर - ले


अलामत - इ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: