कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ८ मार्च, २०२२

वैयक्तिक व साहित्यिक परिचय

 🙏🏻परिचय🙏🏻


१. शिक्षकाचे पूर्ण नाव : श्रीमती शिल्पा मनोहर वाघमारे 

२. कार्यरत शाळा :जि प प्रा शाळा मालेगाव खु ता गेवराई जि बीड 

३. केंद्र जि प प्रा शाळा, कन्या उमापूर 

४. तालुका: गेवराई जि. बीड

🟧🟦🟪

५. प्रथम नेमणूक दिनांक : ०१.०२.२००६

🟧🟦🟪

६. सध्याच्या शाळेवर रुजू दिनांक ०१.०२.२००६

Orthopedicaly Handicapped (दिव्यांग) 

🟧🟦🟪

७. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता

BA DEd

🟪🟦🟧


*आवड:-* 

1) कविता, गीत लेखन,

2) चारोळी लेखन

3)  गीत गायन 

4) वाचनाची आवड

5) चित्र, रांगोळी रेखाटन


८. शाळा प्रकार (प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक) : प्राथमिक शाळा इ 1ते 4


९.शाळेमध्ये कार्यरत एकूण शिक्षक संख्या : 4

🟪🟦🟧

१०. शाळेमध्ये असणारे वर्ग

(१ ते ४,१ ते५,१ ते८,१ ते १०) : १ ते ४

🟧🟦🟪

११. शाळेमध्ये प्रविष्ट एकुण विद्यार्थी संख्या 


🟧🟦🟪

१२. समाज सहभागातून केलेला शाळा विकास : 


शाळेतील सर्व सहकारी शिक्षक, पालक व समस्त गावकऱ्यांचा उत्तम समन्वय आहे. श्रमातून हे साध्य होत आहे. कारण शाळेचे सर्व उपक्रम एक गटकार्य आहे. ते कुण्या एकाला करणे शक्य नाही. 

एकमेकांची साथ असेल तरच हे शक्य आहे,असे मला वाटते. 

त्यामुळे माझी शाळा ही माझ्या सर्व सर्व सहकारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या कार्याचे फलित आहे. 

शालेय रंगकाम तसेच सर्व शिक्षकांनी स्वतः केलेले फरशीवरील रंगकाम व LED T V, Paver Blocksनी सुसज्ज आहे. 


उल्लेखनीय बाब... 


शाळेच्या कार्यालयाच्या भित्तीकेवर मा. मुख्याध्यापक श्री घाडगे सर यांनी माझी 'मानाचा मुजरा' ही मराठी भाषभिमानावर रचलेली कविता लिहून माझ्या शब्दांचा खूप मोठा सन्मान केला. त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. 



शाळेत बोअर वेल, पाण्याची टाकी, handwash स्टेशन, इ. सर्व सुविधा असून शालेय परिसर विविध तरुवरांनी समृद्ध आहे. 

🟧🟦🟪


१३. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आयोजित केलेले शैक्षणिक उपक्रम :



इंग्रजी विषय शालेय शिक्षणात असला तरी त्यासाठी अत्यावश्यक वातावरण घरी वा समाज तितकेसे नाही. म्हणून या विषयाची भिती कमी होऊन त्यासाठीची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी 

दर सोमवारी इंग्रजी परिपाठात इंग्रजीतून प्रतिज्ञा, संविधानाची उद्देशिका, मुलांच्या माहितीतील कथाच इंग्रजीतून सांगण्यात येते.

 यातून इंग्रजीचे श्रवणकौशल्य वृद्धिंगत करणे हाच मुख्य उद्देश. सुविचार, इंग्रजी गीत, कविता, तसेच फलकलेखनही करण्यात येते. 


तसेच शक्य होईल तसे विविध वस्तूंसाठी इंग्रजी शब्द वापरणे, लहान लहान सुचना, प्रश्न यांचा वापर केल्याने इंग्रजी सहज वाटायला लागते. 

LFW....... म्हणजेच leap For Word 'चला बनूया इंग्लिश साक्षर' या उपक्रमांतर्गत 2018 पासून राबवत आहे. त्यामुळे अक्षरांचे आवाज व त्यातून स्वतः उच्चारारांवरुन इंग्रजी शब्द मुले तयार करु लागली. तसे पाठातील बराचसा भाग मुले अतिशय उत्तमरीत्या वाचता येत असल्याने मुलांना आनंद वाटू लागला. भीती  दूर करण्यासाठी नक्कीच मदत होत आहे. 


इतर दिवशी परिपाठात विविध प्रार्थना, देशभक्तीपर गीते तारखेनुसार पाढे, वाचन, कवायत, योगासने इ. घेतले जाते.

🟧🟦🟪

१४. शाळेमध्ये नीतिमूल्य, जीवनमूल्ये विकासासाठी आयोजित सहशालेय उपक्रम


आनंद बाजार, वार्षिक स्नेहसंमेलनासह 

विविध थोर स्त्री पुरुषांच्या जयंती उत्सव व दिनविशेषचे वेळी चित्रकला, वै. प्रयोग प्रदर्शन, कथाकथन, कविता गायन, वेशभूषा स्पर्धा, पाढे पाठांतर, सुलेखन, रांगोळी, वाचन... इत्यादी स्पर्धा घेतल्या जातात. 



१५. शाळेमध्ये प्रभावी शिक्षणासाठी आयोजित अभिनव प्रयोग 

(ICT चा प्रयोग, आनंददायी शिक्षण, शैक्षणिक साहित्य निर्मिती, ज्ञानरचनावादी अध्ययन पद्धती, इतर)

:

 अक्षर, शब्द आणि वाक्य कार्ड्स, बेरीज गिरणी, शब्दचक्र, वारांची गाडी, जोडाक्षरांची फुले इ शैक्षणिक साहित्य निर्मिती, फरशी रंगकाम, इ. 



सापशिडी व  विविध शैक्षणिक खेळ, उलट व जलद पाढे उजळणी वाचन, उलट हाताने लिहिणे, पाठाचे व गोष्टींचे नाट्यीकरण, इत्यादी. 


उपक्रम :


एक दिवस एक पान वाचन, चिमणी दिनानिमित्त घरटी बनवणे, कविता लेखन सराव, 

बालसाहित्य संमेलन गेवराई येथे विद्यार्थ्यांचा 'उमलत्या कलिका' बालकविता संग्रह प्रकाशित... 


विविध प्रकारचे 

१६. सामाजिक जागरूकता निर्मितीसाठी, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता भावना निर्मितीसाठी आयोजित उपक्रम.


वृक्षारोपण, वृक्षांविषयी कृतज्ञभाव जागृत करण्यासाठी वृक्षरक्षाबंधन, 

होळीनिमित्त वृक्षतोडीमुळे होणारी हानी थांबवण्याच्या हेतूने  'वृक्षपूजन उपक्रम'


प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरापासून परावृत्त करण्यासाठी 'शाळेतच कापडी पिशव्या शिवणे' हा उपक्रम


सामाजिक कार्यासाठी निनावी मदत करते.. त्यामुळे त्याबद्दल कृपया लिहू नये.... जाहिर केल्यास माझी प्रतिज्ञा मोडणारे ठरेल. 🙏🏻🙏🏻🙏🏻



१७. स्पर्धा परीक्षांचे आयोजन आणि यश. 

मंथन प्रज्ञाशोध परिक्षेसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. 


१८ विविध प्रशिक्षणामध्ये सहभाग.

CCE, Tejas TAG प्रशिक्षण, NISHTHA, सारख्या सर्व प्रशिक्षणासाठी तसेच वेध, इतर शैक्षणिक कार्यशाळांमध्येही सक्रिय सहभाग. 


तसेच 


२१. विविध विषयावर आधारित लेखन सहभाग व प्रकाशित साहित्य.


उत्तर :.... दुसऱ्या पोस्टमधे सविस्तर 




२२. आपण राबविलेले इतर उल्लेखनीय उपक्रम उपक्रम


गणित दिवसानिमित्त सर्व गणितीय साहित्यापासून  'गणित रांगोळी'


*साहित्यिक परिचय:*


*आवडते पुस्तक:* ग्रंथ ज्ञानेश्वरी,

,श्यामची आई, 



*साहित्य क्षेत्रात :-* 6 वर्षापासून कार्यरत


*प्रकाशित साहित्य:-* 

पुस्तक प्रकाशीत नाही. पण अनेक व्रुत्तपत्र, मासिके, ई-मासिके, पाक्षिक, दिवाळी अंकात, प्रातिनीधीक काव्यसंग्रहात  कविता व  चारोळी,प्रकाशीत.


*शैक्षणिक व साहित्य संमेलन सहभाग:-*

संमेलने

१)राज्यस्तरीय साहित्य संमेलन लातूर 


२)राज्यस्तरीय शिक्षिका साहित्य संमेलन, उमरगा


४) अँक्टीव्ह टिचर्स महाराष्ट्र साहित्य संमेलन, औरंगाबाद


५) षट्कोळी साहित्यप्रेमी समुह काव्यसंमेलन, देवगड


६) अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद अमरावती


७)सखींची काव्यमैफील, बीड


८) अखिल भारतीय साहित्य संमेलन,उस्मानाबाद


९) उपेक्षितांचे अंतरंग कवी संमेलन,आनंदग्राम,बीड


१०) कविकट्टा, ATM शिक्षण संमेलन, फुलगाव


११) कविकट्टा, ATM शिक्षण संमेलन, नाशिक


१२) साहित्य यात्री परिवार कविसंमेलन, पैठण


१३) साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान, राज्यस्तरीय साहित्य संमेलन, औरंगाबाद.


१४) लाँकडाऊनमध्ये अनेक आँनलाईन संमेलन व इंटरनँशनल संमेलनात सहभाग.


१५) रानफूल साहित्य मंच उस्मानाबाद यांच्या चॅनेलवर कवितागायन रेकॉर्डिंगची संधी प्राप्त... 


प्रतिलिपी, स्टोरीमिरर वर अनेक कविता प्रकाशित असून त्यांनी वेळोवेळी आयोजित केलेल्या स्पर्धांमधून बक्षीस प्राप्त. 


*साहित्यातला आवडता प्रकार:-* कविता, चारोळी


*आवडते साहित्यिक :-* संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, स्वा. सावरकर , बहिणाबाई चौधरी.


*साहित्यातील आपले ध्येय:-* कर्तव्यापथावर जीवन समर्पित करत लेखन करत राहणे. कवितांच्या माध्यमातून नवविचापेरणी करत समाज जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःचा  काव्यसंग्रह, चारोळी संग्रह प्रकाशीत करणे.


सदस्य 

🔸मैत्रा फाऊंडेशन, बीड 

🔹रचियता साहित्य मंच नागपूर

🔸(शब्दवेल साहित्य मंच) जाई फाऊंडेशन रजि. मुंबई  

🔹अ. भाग. मराठी लेखक कवी संघटना, *तालुका सहसचिव*



*मिळालेले सन्मान*


      अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद अमरावती येथे 1078 कवितांमधून पहिल्या 100 कवितांमधे माय मराठी या कवितेची निवड. 


         मराठीचे शिलेदार साहित्य समुह, नागपूर अंतर्गत  काव्यरत्न पुरस्कार -2019.


         शब्दगंध समूह प्रकाशन, औरंगाबाद आयोजीत राज्यस्तरीय 'सावित्रबाई फुले आदर्श शिक्षिका' पुरस्कार - फेब्रुवारी - 2020


 अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त (रजि) मुंबई यांचा वर्ष 2021 चा 'राज्यस्तरीय अष्टपैलू काव्यरत्न पुरस्कार'


Face book वर 'कृष्णार्पित काव्यशिल्प' स्वरचित कविता पेज

तसेच 

'स्वरसमृद्धी' हे स्वतः गायलेल्या गीतांचा संग्रह पेज.. नुकतेच सुरु केले आहे.


अभिजात मराठी शिक्षक साहित्य मंच अमरावती यांच्या ' मायमराठी' राज्यस्तरीय विद्यार्थी गुणवत्ता विकास मंचच्या ज्ञानदर्पण', 'महाराष्ट्र माझा', 'माझी शाळा', इत्यादी प्रातिनिधिक काव्यसंग्रहांत कविता प्रकाशित. 


विविध वॉटस्ॲप गायन समुहात

Karaoke track वर गायन, कविता लेखन स्पर्धांमध्ये सहभाग व सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट या स्तरावर अनेकदा निवड.

विविध प्रमाणपत्रे, वस्तू व रोख रक्कम स्वरुपात बक्षीसे प्राप्त.


विद्यार्थी गुणवत्ता विकास मंच समुहाच्या 'शोधा बघू कुठे लपली म्हण' या उपक्रमांतर्गत १०० म्हणीं digital निर्मिती.


'कृतीशील शिक्षक महाराष्ट्र' ATM साठी 4 गीतांचे लेखन व गायन


धन्यवाद

🟧🟪🟦🟧🟪🟦🟧🟪🟦

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: