🌹करुणासागर सिंधुताई 🌹
सिंधू होती ती मायेचा
अफाट करुणागर
शब्द तोकडे वर्णाया
अमृताची ती घागर... १
दुःख ती कोळून प्याली
वेदनेची ढाल केली
वैशाखवणवा झेली
तीच झाली सावली...२
तुफान वादळी त्यांच्या
दिली मायेची पाखर
पंखाखाली पक्षीणीच्या
सनाथ झाली लेकरं... ३
काव्य फुलांतून कधी
शब्दांचे वार केले
बुरसटल्या विचारा
क्षणोक्षणी ठार केले...४
घेत स्मशानठिणगी
पेटवला तो अंधार
लख्ख करीत जीवना
मांडी अनोखा संसार...५
खरी ती रणरागिनी
तीच काली पूजनीय
संजिवनी घे जाणूनी
स्फुर्तिदायी वंदनीय...६
रचना
श्रीमती शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा