थकले रे पांडुरंगा,
अजुनी किती धावू
विषयांनी जीवास का
घातले रे न्हाऊ
सांडू पाहे कैकदा 'मी',
जीवा कैसी या सोडवू
दया कर दयानिधी...
असा घोर नको लावू...
तूच घे करुनी भक्ती
मज ना खरी खोटी ठावे
कुठे ठेवू वाचवोनी
मन हे मलिन न व्हावे
कहर केला विषयांनी
नाथा सांग कुठे जाऊ? ...
तुझीच काया वाचा मन
त्यात पांडुरंग जप......... Empty???
का तरी कोंडले श्वास दीन
का ना सोडविशी यातून
दीप तव नामाचा हृदयी
जपला.. नको विझू देऊ...
रचना
शिल्पा म वाघमारे
अकोला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा