कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

सलोखा समाजाशी

 सलोखा समाजाशी


सलोखा समाजाशी साधणं

म्हणजे बंध केवळ जपलेलं 

त्यातच पहा मग आपलं 

खरं हित असतं लपलेलं ... १


सुखदुःखात सहभागी होणं

गरजेवेळी आधार व्हावे 

आपल्याला हवं तेव्हा 

हक्काने मदतीस बोलवावे...२


काय म्हणताय.. काय चाललंय

सहजच विचारलं पाहिजे

ओळखीचं भेटलं की

गालावर स्मित आलं पाहिजे...३


उगाच भांडण, वाद, किरकिर

कधीच नसते कामाची

समजून घ्यावं 'मोठं' होऊन

शब्दफुले उधळून प्रेमाची...४


लहानपणाही घ्यावा कधी

चुकलं तर मागा क्षमा

एवढं काय अडून बसायचं

'अहम्' अडगळीत करा जमा... ५


मैत्र, स्नेह, सलोख्यानेच

आनंदतरु बहरुन जाईल 

दुःख, वेदना, संकटांचा

डाव सारा मोडून जाईल... ६



काव्यरचना 

शिल्पा म वाघमारे 

सहशिक्षिका बीड 

१९.११.२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: