कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
आई वाही भार सारा
बाळ वाढता वाढता
ऋण शब्दांतीत सारे
न ये उतराई होता...
बाप वाकला ओझ्याने
तरी मधाळ अंतरी
त्याची पाठीवर थाप
देई सतत उभारी...
गुरु देवाहून थोर
त्याचे पायी वाही श्वास
जागृतीचे सार तोच
देव दावी दर्शनास...
कोणाच्या हो खांद्यावर
ओझे वाहतोया कोण
ठेव स्मरण सर्वथा
तूही ठेव याची जाण...
पावलोपावली तू
देत निरपेक्षपणाने
ओझे घेई खांद्यावरी
ऋण अल्प करी उणे...
रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि १२.०२.२०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा