कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

ऋणनिर्देश.. 20.02.21

 🙏🏻 *सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद...*.🙏🏻 



*खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते. मात्र व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो ! म्हणून...*



 *माझा फक्त जन्मदिवस नव्हताच मुळी, ते तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा,आशीर्वाद व आजवर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावनांचा तो "सोहळा" होता.. निमित्त होतं माझ्यासाठी.*


*हा दिवस खूप काही सांगून जाणारा.. शुभेच्छा संदेशाचा जणू पाऊस पडला..*


*आपणा सर्वांच्या रुपाने पांडुरंगच निमित्त व संधी साधत होता... कोण्या जन्मीचं हे पुण्य.... असा विचार... विचार करायला भाग पाडत होता.*


*सकाळी11 च्या सुमारास माझ्या प्रिय सख्या प्रतिभाताई शिंदे व सविताताई ढाकणे यांनी घरी येऊन थाटामाटात जन्मदिन साजरा केला. मला तर अक्षरशः बालपणात खेचून नेलं त्यांनी..*


 *साहित्य प्रेमी उत्कृष्ट वऱ्हाडी कवी व लेखक आदरणीय प्रविणजी बोपुलकर यांनी शब्दवेल साहित्य समुहतर्फे Google meet वर चक्क online कवी संमेलन आयोजित करुन एक चिरस्मरणीय भेट दिली.* 

*अनेक दिग्गज साहित्यिक, गझलकार, कवी यांच्या मार्गदर्शन व पांडुरंगासाठी रचलेल्या रचनांनी भक्तीमय सोहळाच रंगला होता.*



        *माझ्या वाढदिवसाला सर्वच क्षेत्रातील लहान,थोरा-मोठ्यांनी  दिलेल्या अमुल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशीर्वादांचा मी मनापासुन स्विकार करते व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील  किंवा* *अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागते !*

*असेच स्नेह,प्रेम व आशीर्वाद* *माझ्यावर निरंतर राहु द्या .हिच ऊर्जा पावलोपावली भरारी घेण्याचं बळ देत राहिल.!!*


*आपण सर्व आप्तेष्ट, आदरणीय अधिकारी , सहकारी शिक्षक शिक्षिका, मैत्र, सारस्वत मंडळी, गावकरी,लाडके विद्यार्थी.... काल प्रत्यक्ष भेट देऊन तसेच विविध समाजमाध्यमांद्वारे शुभेच्छा व भरभरून आशीर्वाद दिले. खरंतर*.... 


*देणाराचे हात हजारो... दुबळी माझी झोळी ...* असाच प्रत्यय येत होता. 


 *'आभार' शब्द त्या सर्वांसाठी नगण्यच आहे अन् मी शब्ददरिद्री आणखी काय व्यक्त होणार..! म्हणून आपणा सर्वांचे पुनःश्च अनंत अनंत आभार मानते !!!*




🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: