*स्वरचंद्रिका , शिल्पाताई !*
उत्कृष्ट अभंगगायनाबद्दल
आपले मनःपूर्वक अभिनंदन !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई,तुमचे स्वर नितळ , निर्मळ
सुखद , प्रसन्न , प्रेरक,भावस्पर्शी,
मंजुळ नि मधुर आहेत .
तुमच्या प्रेरक व्यक्तित्त्वात लेखन नि गायन कलेचा अपूर्व संगम झाला आहे. शब्द आणि स्वर यांचा समृद्ध वाण तुमच्या सारस्वतसाधनेला लाभला आहे.
तुमच्या गायनाचे एक
विलक्षण वैशिष्ट्य हे की,
सुरांसंगे अर्थछटाही
सहजतेने प्रकटत असतात.
अभंगश्रवणाचा आनंद घेताना,
एका एका अभंगात,
उभा केला पांडुरंग|
याची रम्य प्रचिती येत राहते.
तुमच्या अभंगगायनाचा
आस्वाद घेत असताना
एखादी व्यावसायिक,
कसलेली गायिका गात आहे,
याची अनुभूती आल्यावाचून
राहत नाही.
खरोखरच,
तुमच्या अभंग गायनात
सूर, ताल, लय, नाद,भाव
यांचा सुंदर ताटवा
मनमोहक फुलला आहे.
संगीताची सुरेल साथ घेऊन
आपल्या स्वरांच्या प्रतिभेवर
श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणं,
नक्कीच सोपं नाही.
पण, तुमच्या जादुई स्वरांनी
ही किमया निश्चितच साधली आहे.
गीत ही मानवाची मूळभाषा आहे.
मानव गीतातून बोलायला शिकला.
म्हणून मानवी मनाला गीतं
नेहमीच भुरळ घालतात.
दिव्याला त्याची ओळख
सांगावी लागत नाही.
त्याचा प्रकाशच त्याची
ओळख करुन देतो .
हा न्याय तुमच्या अष्टपैलू व्यक्तित्त्वाला १००% लागू होतो.
प्रेरणामूर्ती शिल्पाताई,
तुम्ही तुमच्या गीतांचा
सुरेख अल्बम तयार करा .
कविता , प्रार्थना , भावगीतं
यांचा त्यात समावेश करा .
तुमच्या गायनाला साधनेचे
अधिष्ठान द्या,
सरावाचे मोहक कोंदण करा ,
परिश्रमाच्या तीर्थाचे शिंपण करा ,
पारायणांचा अभिषेक करा .
एक दिवस कलाविश्वाला
तुमचे रमणीय स्वर आणि भावसमृद्ध शब्द
मोहिनी घातल्याशिवाय
राहणार नाहीत.
तुमची गायन/लेखन कला
उत्तरोत्तर बहरत जावो,
रसिकांना मंत्रमुग्ध
करीत राहो !
अशी आई शारदेचरणी
नम्र प्रार्थना , मंगलकामना करतो.
पुनश्च आपले मनःपूर्वक अभिनंदन !
भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा ..
☝🏻☝🏻☝🏻🙏🏻🙏🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा