कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

सोमवार, १८ जानेवारी, २०२१

रंग सुखाचा



✍🏻  रंग सुखाचा..


सुखाचा रंग असो वा

संग असो दुःखाचा

'अभिषेक' करावा मना

'आराध्या'वर भक्ती रसाचा... 


ऐहिकाचा सरेल मोह 

चिर 'ऐश्वर्य'चि लाभेल  

'जया' कळला संसार 

'भाग्यवान तो होईल. 


द्वैताद्वैत मिसळता 

मग कुठली सीमा 'रेखा' ... 

मुक्त जीवा हरीचरणी

विरेल कर्माचा लेखा... 


हे ही जातील, पुन्हाही येतील

गुंतणे हे तर वेळ दवडणे

आल्या घडीस दे सुवर्णस्पर्श 

जीवन ना केवळ येणे - जाणे


✍🏻✍🏻✍🏻𝕾𝖍𝖎𝖑𝖕𝖆

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: