कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

मज राहावले नाही

मज राहावले नाही


    तुझ्या पायी... 


गर्द काळोख दाटला 

ज्ञान वाट हरवली 

लोचनांत बांधलेली

बांध फोडून वाहिली...||१||


सोनकूस अवनीची

चांदण्यांनी शिंपलेली

तरी झापड लोचनी

सारी चैनीस भुलली...||२||


सत्य लयाच्या वाटेला

आनंदाची गेली रया

षडविकारांचे घरी

पाणी भरी क्षमा, दया ...||३||


सुख शोधती बाहेरी

शांती मनातच नाही 

कैफी धुंदलेल्या दिशा. 

'प्रेम' आत्मदाह साही...||४||


तत्क्षणीच  द्यावा  न्याय 

स्पष्ट बोलूनी जनांस

आचरण नासले नि 

संस्कारांचा कोंडे श्वास...||५||


पायी तुझ्या रिती झाले

जरी जाणतोस तू ही

काय करावे सुचेना

मज राहावले नाही...||६||


रचना 

©शिल्पा म वाघमारे 

स शि मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड 

दि २९.१२.२०२० 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: