कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

कांचनसंध्या

 


कांचनसंध्या 


आयुष्याच्या सायंकाळी

सरलेली स्वप्ने सारी

देही गलितगात्र या

ना कसलीच  का उभारी... 1


श्वासांच्या आकडेमोडी

अन् शून्यात पुन्हा हरवणे

निमिषातून निर्मिले होते 

कधी पुन्हा तया आठवणे...2


मी तुझी साथ नि तू  

माझा रे नित्य आधार 

तुझ्या सोबतीने जीवनांगणी

 हा चांदण्यांचा बहर... 3


चल ओवू पुन्हा ती 

मौक्तीके ओघळलेली

ती बकुळफुले आजही 

मधुगंधात नाहलेली...4


स्वप्नकलिका उमलता कैक

कोमेजल्या ना रे अबोली

कर्तव्यजळी विरल्यात बावऱ्या

संसार बंधनी पाऊले गुंतली... 5


या वळणावर घे अनोखा विसावा 

चिलीपिली उडाली सोडून घरटा

क्षितिजावरचे लेऊ रंग चल 

खुणावती बघ ओल्या वाटा... 6


रचना 

© शिल्पा म वाघमारे 

स शि बीड 

 भ्र क्र 9527054205

३०/१२/२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: