कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

पायवाट



पायवाट


तीच पायवाट आहे

तोच रस्ता जोडणारा

तुझ्या मिलनाची ओढ नि

मज सारखा ओढणारा...१


पायवाटेवरच्या त्या खुणा 

अजूनही आहे तशा

मलमली क्षण आठवती नि

चिंब करती आताशा... २


विरहाचा शिण घालवी

पायवाट ही चिंचोळी

विरले सहज तुझ्यात

सजले अंगणी रांगोळी...३


त्याच खुणा आजही

क्षण सारे ओलावती

पुन्हा नव्याने वाटते

तीच नवी मी नवती... ४


रचना

© शिल्पा म वाघमारे

स शि बीड

भ्र क्र 9527054205

दि. 15.01.2021

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: