कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

अभिनंदन

 आदरणीय विनोददादा...

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


अभिनंदन 


तुझे गुण किती गावे...तू गुणातीत

शब्दांस कसे गुंफावे... तू शब्दातीत


मी पामर मज ना ठावे...तू देवच की देवदूत

तुझे अस्तित्व भारताचे हित....तू मधूस्वर ज्ञानगीत


तू पाकळ्यांची मृदुला... तू प्रेमाची रीत

जीवन क्षणभंगूर तरी.. तू वाहणाऱ्या श्वासांवरची जीत


लहरी जगात या... बहर तू विनीत

विश्वासास पारखे जग.. तू वचनांची पूर्त


क्षणोक्षणी द्वंद्वातही... तू स्थितप्रज्ञ नीत

तू भ्रांतीचा अंत...वाचावे तुजला तर... तू अपरिमित...



*रचना*✍️

*शिल्पा म वाघमारे*

*सहशिक्षिका, बीड*

🌹🌹🌹🌹👇👇👇👇

गुणसुमने किती उधळावी.....तुम्ही गुणातीत

शब्दांस कसे गुंफावे... तुम्ही शब्दातीत


आम्ही पामर आम्हा ना ठावे...तुम्ही देव की देवदूत

या अस्तित्वास अर्थ देण्या....तुम्ही मधुस्वर, ज्ञानगीत


तुम्ही पाकळ्यांतली मृदुला... तुम्ही प्रेमाची रीत

जीवन क्षणभंगूर तरी.. तुम्ही निरपेक्ष भावगीत 


लहरी जगात या... बहर तुम्ही विनीत

विश्वासास पारखे जग.. तुम्ही वचनांची पूर्त 


पंचक्रोशीच्या हरीतक्रांतीचे प्रणेते 

समृद्धीचा निर्मळ आनंद ... संगम तुम्हांत पाहतो... ज्ञान, विज्ञान आणि संगीत 



दिशाहीन दशा आम्ही.... तुम्ही चांदण्यांचा कर्तव्यपथ 

किमयागार निर्मिकासम जणू... बरसत सुखसरी अमित ...


क्षणोक्षणी द्वंद्व हे जीवन.. तुम्ही स्थितप्रज्ञ नीत

तुम्ही भ्रांतीचा अंत...वाचावे कसे तुम्हा .. तुम्ही असीम, अपरिमित...


रचना

*शिल्पा म वाघमारे*

*(शिक्षिका) , जि.प. प्राथ. शाळा, मालेगाव खुर्द ता. गेवराई जि. बीड*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: