स्पर्धेकरिता हास्य कविता
मलमली तारुण्य माझे...
या गीताचे मूळ गीतकार मा.सुरेशजी भट यांची क्षमा मागून...
विडंबन काव्य... स्पर्धेसाठी..
शीर्षक : मुठीत सासर माझे
नवऱ्याचा बैल करुनी, तू तयाला राबवावे |
ठेवूनी मुठीत सासू, सासर सारे गाजवावे.. ||धृ||
तुझिया जीवनी गुलाबी , पहाट ती व्हावी नवी की
स्वप्न जे डोळ्यांत कधीचे, पूर्णत्वा तू पोहचवावे... ||१||
दीर आणि जावा सारे, नणंदही तुज घाबरावी
कोडे पडावे तयांना अन् कधीही ना सुटावे... ||२||
रे.. सरो प्रणयांत रात, दिवसही ऐटीत जावा
आजवर छळले मला ते, क्षण तयांना आठवावे...||३||
मर्दानी जागव आतली, चंडिका तू हो गडे
प्रचिती येता तयांना , प्रेमात तुझिया विरवावे...||४||
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
भ्र क्र 9527054205
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा