अलक कथा
गणित.... किती सोप्पं!
गणिताचा अभ्यास करायचा म्हटलं.. तर भारीच कंटाळा करणार समृद्धी.
तिला आता सांगून समजावून नाकी नऊ आले.. की गणित हे सर्व शास्त्रांचं शास्त्र.. त्याशिवाय कुठेही कामं अडणारंच...
काल बाजारात तिला घेऊन गेले तर पाऊण किलो बटाट्याचे 🥔, अर्धा किलो टोमॅटो 🍅 व पाव किलो 🍆वांगी यांचा हिशेब मनातच करुन तिने पैसे अगदी बरोबर दिले.
तेव्हा या अनोख्या अनुभवाने भारीच वाटलं. अन् तिला शाबासकी देत म्हणाले, "यापेक्षा तरी काय वेगळे असते गणित!"
तिच्या चेहर्यावरही अनामिक चमक होती.
लेखन
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि. २२.१२.२०२०
गणित दिनाच्या निमित्ताने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा