कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

@ बालकविता हसत खेळत... शिका गणित..

हसत खेळत... शिका गणित...



मी असे कुणाच्या आवडीचा
तर कुणाच्या नावडीचा
असाच मी…मला नका रे घाबरु
वेळ काढा जरा सवडीचा...धृ

मी आहे गणित
तुला आहे माहित
संख्यांचे देतो ज्ञान.....
शास्त्रांचे म्हणती शास्त्र मला
सगळ्यांत मोठा माझा मान

नका जाऊ रे पळून,पहा मला जवळून
सराव करा थोडा पाढ्यांचा
.. १

अंकांची कधी
भुमितीची कधी
 उदाहरणेही सोडवा... 
गट्टी करा माझ्याशी जरा
खेळांतून मला मित्र बनवा

येईल मज्जा अशी,मनी फुलेल खुशी
विसर पडेल तुम्हा वेळेचा... २

कधी चित्रे काढून
बिया,खडे जमवून
संख्यांच्या करुन क्रिया
घड्याळातला वेळ
आणि पैशांचा मेळ
आता हवा की शिकाया

नका बसू रडत,शिका हसत खेळत
बघा होईल मी आवडीचा... ३



गीत रचना
© शिल्पा म वाघमारे
स शिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
दि ०८.०५.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: