कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

जिथे तिथे रूप तुझे देवा


 *जिथे तिथे रुप तुझे*


माझे मन रंगी देवा।

रामनाम मनी ठेवा।

घडो याचि देही सेवा

        हेचि मागणे पायी.. . १


वारी केली वारवार ।

पाहिले रे  पंढरपुर।

मना माझ्या तू सावर।

         माझ्या नंदकिशोरा . . .२


तुझ्यासाठी बघ आज

अधीरतेचा मनी साज

घुमे कानात आवाज

       मधूर तो वेणुचा . . .३


बंध तुझ्याशी बांधले

संसारास मी तोडले

हरी पंजरी गुंतवले

       मनाच्या पाखरासि. . .४


नयनी या रुप तुझे 

काय पाहू आणिक दुजे 

 हरीनाम मनी विराजे

   ये रे बा विठ्ठला... ५ 


येई प्रचिती वारंवार

अंतरास तुझे का अंतर

तरी चित्तास नाही थार

      सांग बा  काय करु?... ६

रचना✍🏻

©शिल्पा म.वाघमारे

 स.शि.बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: