कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, २५ जुलै, २०२०

@ चला भिजायला.. बालकविता

बालकविता 

चला रे भिजायला... 

गार गार आला वारा
संगतीला पाऊसधारा
शुभ्र टपोऱ्या या गारा
....... चला वेचुया रे चला चला वेचुया ||१||

फांदी फांदी लगडली
जांभळांनी गर्दी केली
वाऱ्यानेही साथ दिली
....... चला खाऊया रे चला खाऊया
||२ ||

डोळे कसे वटारतो
बेडूकदादा डरावतो
डबक्यात कसा राहतो
....... चला पाहुया रे चला पाहुया ||३||

नदी वाहे खळखळ
पानोपानी सळसळ 
गोड गातोया कोकिळ 
.......चला शोधुया रे चला शोधुया ||४ ||

राजा डोंगर सजला
मोर खुलला, नाचला
पोर पोर उंडारला
....... चला नाचूया रे चला नाचूया ||५||

भिजूनिया होऊ चिंब
रान पाखरांच्या संग
उधळू आनंदाचे रंग
....... चला रंगूया रे चला रंगूया... ||६||



रचना 
© शिल्पा म वाघमारे 
स शिक्षिका 
मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड 
दि १३.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: