कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

माळता तू मोगरा

माळता तू मोगरा 


गंधाळल्या कालिकांचा
माळियते आज गजरा
फुलला असा केसांत आणिक
मनात हसला मोगरा

शांत लहरी उसळल्या 
प्रिया माळता तू मोगरा 
रम्यकाळी जणू दोघांत
एकांत सोहळा साजरा

तुझा स्पर्श होता तया
अधिकच तो रंगी रंगला
निमित्त केवळ गजऱ्याचे नि
तू डाव तुझा साधला

मी गंध भरल्या तनूची 
रंगसरींत तुझ्या भिजले
अशी काही विरले तुझ्यात 
रातराणी होऊन बहरले.. 

©रचना 
शिल्पा म वाघमारे 
स शि मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
दि 31.7.20

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: