कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, १२ जुलै, २०२०

खेळ संचिताचा

खेळ संचिताचा


एवढीशी ती पोर, असेल दहा-बारा वर्षांची
 तोल सावरत दोरीवर, लांब त्या बांबूसह...

जीव धरते मुठीत, कधी जरी चाचरते
पण पोटातल्या आगीपायी... पुन्हा एकदा सावरते...

रोजच्या तगमगीचा हाच एक उपाय आहे
अनुभवलेल्या भुकेचंही रोजचंच का नाटक आहे... 

आज पुन्हा चढली ती... कदाचित् पुन्हा उपाशी
मुकपणे लढत आहे रोज नव्या संकटांशी...

नवलाने पाहतात लोक जरी
सारे खिशातले काढत नसतात..

तोंड वळवून जाणारेही पुढे 
मान वळवून पाहत असतात... 

पोटापुरतं मिळेलच रोज..असं काही निश्चित नसतं
आपलं कर्म करतेच तरी .. बाकी सारं संचित असतं... 

रचना 
© शिल्पा म वाघमारे 
स शिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: