प्रीत
प्रीत कळेना ही
माझिया मनाला
काय हवे नको
मज या क्षणाला...
अनामिक बंधी
प्रिती ही जुळली
मलमली क्षणी
काळजा भिडली...
मी न आता माझी
न तू तुझा आता रे
या स्वप्नवेड्या मनी
क्षणात कापरे...
मोहरली जाई
तशी मी ही बहरले
तुझ्या नयनांनी
गोड वार केले...
रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि १८.०७.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा