गीत...
कधी उघडेल माझी शाळा
घरात राहून राहून
मला आलाय ग कंटाळा
सांग ना गं आई
कधी उघडेल माझी शाळा...धृ
सखे सोबती का गं झाले दूर आई
खेळात एकट्याने मज्जा येणार नाही
......
चित्र रंगवले बघ, अन् अभ्यासही झाला...
सांग ना गं आई कधी उघडेल माझी शाळा .... १
छोटी छोटी कामे सारी, शिकले गं बाई
कंटाळवाणे झाले... टि. व्ही. पाहणेही ......
वाटुकली माझीही पाहत असेल का गं शाळा?
सांग ना गं आई कधी उघडेल माझी शाळा ........ २
गीत रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि. २०.०५.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा