कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शुक्रवार, १२ जून, २०२०

सागरा

सागरा 🌊 🌊🌊

विनम्र वंदन तुजला 
सागरा हे रत्नाकरा
दृष्टीस हेरवे ना
अथांग हा पसारा...१ 

निळाईत रंगलेला
शांत गार वारा
रत्न दिव्य खाणी
निरपेक्ष हा किनारा...२

जलदांस जन्म देशी
धरणीस देत श्वास
सखा तूच तटिनींचा
अढळ तया विश्वास...३

प्रेम युगांची कैक 
साक्ष निरंतर होशी
प्रेमाचा गहिरा भाव
जणू त्यांस शिकवशी...४

विनायकाच्या मनी
तळमळ जागवूनी
भेटवली मायभू त्या 
काव्यप्रेरणा होवूनी...५

रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: