आद्यप्रेरणा काव्याची*.... *संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज* देव होऊन जावे का भुलोकी ज्ञान द्यावयासी की निराळे काही करावे अज्ञान मिटवावयासि ||१|| विचारांती देवाधिदेवाने निर्धार असेल का केला? स्वये पांडुरंगच भुलोकी ज्ञानदेवरुपे अवतरला ||२|| विठ्ठल-रूख्मिणीच्या पोटी जन्माष्टमी मुहुर्ताला ईश्वरच जो ज्ञानाचा ज्योतिर्मय साकारला ||३|| बंधू निवृत्ती, सोपान सवे मुक्ताई इवली एकाचढी एक थोर जणू दिव्य रत्नवेली ||४|| पोरं ही संन्याशाची जन त्यांस हिनवती रेड्यामुखी वदवूनी वेद दावियली दिप्ती ||५|| परार्ध सहस्ररश्मींचे तेज ते स्वयंप्रकाशी त्रिखंडातही तुलना न होई त्या कोणाशी ||६|| ज्ञानफुले जी माधवाच्या श्रीमुखातून सांडियली सिद् ध ज्ञानदेवे तया दिपिकेत गुंफियली ||७|| परम् पदाची उन्मनी अशी साधली साधली सच्चिदानंदबाबांसाठी चिरसंजीवनी जाहली ||८|| शुद्ध झरे ते प्रवाही सुधा जणू गवळणी जगण्याचा सार सांगे होऊन कृष्णविरहिणी ||९|| प्रेमपान्हा माऊलींचा ओवी 'अमृतानुभवाची' आद्यप्रेरणा तीच खरी या साऱ्या साहित्यिकांची ||१०|| त्यांच्याच कृपामृतांचे सिंचन माझ्या शब्दवेलींना त्याच पदकमली अर्पिते उमलत्या काव्यकलिकांना ||११|| रचना शिल्पा म.वाघमारे सहशिक्षिका जि प प्रा शाळा, मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड 10/6/19,
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
मंगळवार, ५ मे, २०२०
आद्यप्रेरणा काव्याची*.... *संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज*
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा