कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ मे, २०२०

अनोखी होळी

अनोखी होळी

धगधगते तुफान चेतू दे मनी्््
पेटव रान विषयांचे विषारी
संयम, शांती जागवून मित्रा
दीप्ती हो काळोखाच्या प्रहरी... ||१||

स्वतःस झोकूनी सत्कर्म सागरी
भान हरपावे नित्य निरपेक्षतेत
अनोखी करुया होळी या क्षणी
जीवनपुष्प गंधाळावे प्रेमरंगी वसंतात||२ ||

सन्मार्गावर चालायचे आता
कुविचारांची करुया होळी
शुद्ध विचारपेरणी करावी
उज्ज्वल टिळा लावूनी भाळी ||३||

माणूस पाहू माणसातला
प्रेमाचा स्पर्श त्याला देऊ
त्या गालावरच्या चंद्रखळीचे
आज चला हो निमित्त होऊ ||४ ||

रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि 3.3.2020