रिक्तता
'केवळ रघुनंदन राम
आवडे सर्वथा मजला
हृदयस्थ विराजत जो
नामफुलांनी सजला... १
जिथून आले आणि जायचे
त्या महातेजाचा अंश मी
तोच आवडे सर्वकाळ मज
अखंड विश्वाचा जो स्वामी...२
सुख, दुःखाच्या नि मोक्षाच्या
परते तयाचे स्थान असे
अनासक्त जो कर्ता करविता
तयाविण न काही और दिसे..३
जळी स्थळी तो वसलेला
भार वाहतो सृष्टीचा
भवबंध सुटता आभासी
अनुभव येईल जागृतीचा...४
तोच राम,रहिमही तोचि
एक सर्वथा मनी वसे
विभिन्न नावे जरी तयाची
'नाम' संकटी तारतसे..५
नाम घेऊया अनन्यभावे
जिथून आले आणि जायचे
त्या महातेजाचा अंश मी
तोच आवडे सर्वकाळ मज
अखंड विश्वाचा जो स्वामी...२
सुख, दुःखाच्या नि मोक्षाच्या
परते तयाचे स्थान असे
अनासक्त जो कर्ता करविता
तयाविण न काही और दिसे..३
जळी स्थळी तो वसलेला
भार वाहतो सृष्टीचा
भवबंध सुटता आभासी
अनुभव येईल जागृतीचा...४
तोच राम,रहिमही तोचि
एक सर्वथा मनी वसे
विभिन्न नावे जरी तयाची
'नाम' संकटी तारतसे..५
नाम घेऊया अनन्यभावे
भावफुलांची भरली ओंजळ
रिक्तच व्हावे नरजन्मी या
रिक्तच व्हावे नरजन्मी या
मनी प्रार्थना एकच प्रांजळ ..६
रचना
©शिल्पा म. वाघमारे (कुलट)
सहशिक्षिका
©शिल्पा म. वाघमारे (कुलट)
सहशिक्षिका
अकोला
दि 7.4.2020
दि 7.4.2020