धडधडीत जे खोटं बोलतात
स्वार्थात जे सुख शोधतात
मी पणा केवळ मिरवतात
तेव्हा मला राग येतो...😡
एकच बाजू ऐकून नित्य
न्याय देण्याचा आव आणतात
स्वतःसच जेव्हा शहाणे जाणतात
तेव्हा मला राग येतो...😡
नियम टांगत धाब्यावर
इतरांनाही धोक्यात टाकतात
व्यसनात जेव्हा सुख मानतात
तेव्हा मला राग येतो... 😡
स्वातंत्र्य हिरावून इतरांचे
मुजोरपणा दाखवतात
इतरांच्या जीवनास
आपल्याच बापाची सत्ता मानतात..
तेव्हा मला राग येतो 😡
माझा राग, माझा असतो
त्यांना फरक पडत नाही
अमर स्वतःला मानतात ते
तेव्हा मला राग येतो 😡
रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि २०.०५.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा