कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २० मे, २०२०

दोस्त माझे निसर्गातले.

दोस्त माझे निसर्गातले...

निसर्गात या सारे
दोस्त यार हो सारे... १

समर्पित असती वृक्ष
दातृत्व हेच त्यांचे लक्ष्य... २

मंजूळ सुस्वर विहंग
ताणतणाव करती भंग... ३

पर्वत उंच विशाल
सांगे तू होई अचल... ४

सरितसागर शिकवी प्रेम
संपूर्ण त्याग हेच मर्म... ५

धरा साहे चराचर भार
सुचवी होण्या पराधार...६

भाग्याने मज लाभले
दोस्त माझे निसर्गातले... ७

रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: