सुख म्हणजे नक्की काय असतं...
ज्याच्या शोधात भरकटतो
प्रत्येकजन जन्मापासून
सुख म्हणजे नक्की काय
हे न जाणल्यावाचून... १
जग अथांग मायासागर
सुख-दुःख जणू की लाटा
विरतील पुन्हा येथेची
श्वासांच्या पाऊलवाटा... २
क्षणिक थांबून हे जीवा
ज्ञानबोधात मर्म तू जाण
जागव ना स्वचैतन्य
परम् सुखाची तेथ खाण... ३
अंतरात दडलेल्या सुखराशी
अपेक्षांकारणे जावो पाहे
अप्रिय स्थिती वियोग
ही दुःखाची संज्ञा आहे...४
समसमान ठेवून भाव
तटस्थ राहून जगावे
मनवाऱ्यासवे धावू नको
प्रभूपायी तयास अर्पावे...५
रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि ४.०५.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा