चिमणी पाखरं
चिमण्या पाखरांनो
रान सुने आज का रे
किलबिल नाही कुठे
शांत वारे धावणारे...१
कुणी टाकली ठिणगी
वणव्यात खाक झाले
तरु-वेली डोलणारे
अवचित राख झाले...२
सूर सजवले होते
तुम्ही कधी फांदीवर
स्वप्न घरट्यातलेही
टिचलेच खरोखर...३
माणसांत वसलेला
क्रूर स्वार्थ आड आला
सुख बेगडी चाखण्या
त्याने बाजार मांडला...४
वाहे ओघात काळाच्या
दृष्टीहिन तो जाहला
पाखरांनो त्याच्यापायी
सारे प्राणाला मुकला...५
वितभर पोट.. भरलं तरीही
हाव त्याची सरत नाही
जरी फाटत आली झोळी
तरीही मन भरत नाही... ६
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि. ५.४.२०भढ