कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

चल रे गड्या


*चल रे गड्या...चल दोस्ता*

चमचम करतेय दूरवरी नीर
माय नदी वाहतेय वरीसभर

झाडीवेली दाटलेली तिच्या तीरावर
कुणी काढलं रे दोस्ता चित्र मनोहर

पायवाट चिंचोळी मऊ माती गार
चालताना डोले जीव भरुन येई ऊर

घाई करा दोस्तांनो भरा घागर लवकर
पाहतेया वाट घरी ऊन ऊन भाकर

इवला हा जीव दादू वाकू नको फार
जल भरी जलद नि पुनः ये लवकर

मौज करु जळी थोडी नको रे उशीर
शाळेची वेळ आली होत आवर आवर


रचना
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि ३.४.२०२०